मुंबई : महाराष्ट्रातच रेल्वेला मराठीचं वावडं असल्याचं वृत्त झी २४ तासनं दाखवल्यानंतर मध्य रेल्वेनं त्याची तात्काळ गंभीर दखल घेतलीय. या प्रकरणाची वरिष्ठांकडून दखल घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्याला समज देण्यात आल्याचं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.
तसंच सुभाष जगताप यांना अन्य कोणत्याही भाषेतून अर्ज करण्याची गरज नाही. त्यांना मराठीतूनच माहिती दिली जाईल, असं आश्वासनही रेल्वेनं दिलंय.
अधिक वाचा : रेल्वेमध्ये आजही मराठीची गळचेपी
तिकीट किंवा इंडिकेटरवर मराठीमध्ये माहिती का नसते, असं जगताप यांनी माहिती अधिकारात विचारलं होतं. त्यावर फॉर्म इंग्रजी किंवा हिंदीतून देण्यास मध्य रेल्वेनं सांगितलं होतं.
वाचा ब्लॉग : तिकीट चेकर काकांचा आडमुठेपणा... व्हॉट्सअॅपला पार धुडकावलं...
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.