मुंबईतील या भागातील पाणी पुरवठा बंद

जलवाहिनी दुरुस्ती कामामुळे दिनांक २१ ते दिनांक २२ डिसेंबर, २०१६ दरम्यान एल व एन विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 20, 2016, 11:21 PM IST
मुंबईतील या भागातील पाणी पुरवठा बंद  title=

मुंबई : जलवाहिनी दुरुस्ती कामामुळे दिनांक २१ ते दिनांक २२ डिसेंबर, २०१६ दरम्यान एल व एन विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पवई व्हेंचुरी, ‘एल’ विभाग येथे १८०० मि.मी. व्यासाच्या कॉर्डमेनच्या झडपेवरील ३०० मि.मी. पर्यायी जलवाहिनीची मोठ्या प्रमाणावर होत असलेली गळती थांबविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

सदर काम दिनांक २१.१२.२०१६ रोजी सकाळी १० वाजता सुरु होऊन ते दिनांक २२ डिसेंबर, २०१६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल. या कालावधीत ‘एल’ विभागातील पश्चिम भाग व ‘एन’ विभागातील पश्चिम भाग येथील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. 

परिणामतः बुधवार, दिनांक २१.१२.२०१६ ते गुरुवार, दिनांक २२ डिसेंबर, २०१६ दरम्यान  ‘एल’ विभागातील पश्चिम परिसर व ‘एन’ विभागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशीच पुरेसा पाणीसाठा करावा