मनोहर जोशींवर राणेंचा प्रहार, भुजबळांनीही केलं लक्ष्य!

“अपमान सहन करत राहणं हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि अपमान करून घेत पदं मिळवत राहणं हे मनोहर जोशींचं ब्रिद आहे”, अशा शब्दांत नारायण राणेंनी टीकास्त्र सोडलंय. बाळासाहेबांनी जोशींवर प्रत्येक वेळी विश्वास टाकला आणि त्यांनी मात्र कायम विश्वासघात केला, असं राणे म्हणाले.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 15, 2013, 07:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
“अपमान सहन करत राहणं हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि अपमान करून घेत पदं मिळवत राहणं हे मनोहर जोशींचं ब्रिद आहे”, अशा शब्दांत नारायण राणेंनी टीकास्त्र सोडलंय. बाळासाहेबांनी जोशींवर प्रत्येक वेळी विश्वास टाकला आणि त्यांनी मात्र कायम विश्वासघात केला, असं राणे म्हणाले.
दुसरे माजी शिवसैनिक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांनीही जोशींना लक्ष्य केलंय. सरांनी आयुष्यभर सहकाऱ्यांना सुरुंग लावला आणि शेवटी उद्धवनी त्यांनाच सुरूंग लावला, असा टोला नारायण राणेंनी लगावलाय. मात्र त्यांचा असा अपमान साहेबांनी केला नसता, बंद खोलीत बोलले असते, असं सांगत राणेंनी उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवरही तोफ डागलीये.
मी स्वत: सोडून इतर सगळे शिवसेना सोडून गेले तरी चालतील अशी या कार्याध्यक्षांची भूमिका आहे, असं राणे म्हणाले. तर सगळी पदं आपल्यालाच मिळावीत, असं जोशींना वाटत असल्याची टीका भुजबळांनी केली. यासाठी वामनराव महाडिकांपासून माझ्यापर्यंत, सर्वांना जोशींनी त्रास दिला.
शिवसैनिकांचा सुरूवातीपासून त्यांच्यावर राग होता. केवळ बाळासाहेबांमुळं ते गप्प होते, आता शिवसैनिकांनी जे केलं ते योग्यच होतं, अशा शब्दांत भुजबळांनी तोफ डागलीये.
शिवसेनेमध्ये मनोहर जोशींचा अपमान झाल्यानंतर, कधीकाळी त्यांचे सहकारी असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनीही त्यांच्यावर तोंडसुख घेतलंय. प्रत्येक पद आपल्यालाच मिळावं हा जोशींचा पहिल्यापासूनचा हव्यास होता. नियतीनं जोशींवर सूड उगवला, असा भडीमार भुजबळांनी केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.