बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला नरेंद्र मोदी आणि राज यांची उपस्थिती, Narendra Modi and Raj Thackeray to

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला नरेंद्र मोदी आणि राज यांची उपस्थिती

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला नरेंद्र मोदी आणि राज यांची उपस्थिती
www.24taas.com, झी मीडिया, मुबई

१७ नोव्हेंबर २०१३ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रथम स्मृतिदिन शिवाजी पार्क येथे होत आहे. या कार्यक्रमाला सुमारे ५ लाख शिवसैनिकांची उपस्थिती असेल. विविध पक्षांचे अनेक ज्येष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित असतील. विशेष म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरेही या कार्यक्रमाला हजर राहाणार आहेत.

१७ नोव्हेंबर रोजी राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर श्रद्धांजली देण्यासाठी येणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाममंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर. आर. पाटील, पाटबंधारेमंत्री सुनील तटकरे, रिपाइंचे रामदास आठवले, शेकापचे जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व इतर नेते या वेळी उपस्थित राहतील.

या श्रद्धांजली कार्यक्रमाला नारायण राणे, मनोहर जोशी हे उपस्थित राहतील काय, याबाबत उत्सुकता कायम आहे. मनोहर जोशी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांच्य़ातील संबंध बिघडले असल्यामुळे या प्रसंगी दसरा मेळाव्याप्रमाणे जोशींवर नामुष्की सहन करण्य़ाची वेळ येणार का हा प्रश्न आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, November 13, 2013, 13:59


comments powered by Disqus