नववर्षाची सुरुवात देव दर्शनाने, सिद्धिविनायक, साईबाबा मंदिरात गर्दी

नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनानं करण्यासाठी साईभक्तांची शिर्डीत गर्दी केली आहे. तर. मुंबईत सिद्धिविनायकालाही भक्तांच्या रांगा दिसत आहेत. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठीही भाविकांची रीघ आहे.

Updated: Jan 1, 2015, 11:22 AM IST
नववर्षाची सुरुवात देव दर्शनाने, सिद्धिविनायक, साईबाबा मंदिरात गर्दी title=

मुंबई : नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनानं करण्यासाठी साईभक्तांची शिर्डीत गर्दी केली आहे. तर. मुंबईत सिद्धिविनायकालाही भक्तांच्या रांगा दिसत आहेत. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठीही भाविकांची रीघ आहे.

नव्या वर्षाची सुरुवात श्रीगणेशाच्या दर्शनानं करण्यासाठी अनेक गणेशभक्त दरवर्षी सिद्धीविनायकाच्या दर्शनाला येतात.आजही अनेक गणेशभक्तांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेत नव्या वर्षाच्या सुखसमृद्धीसाची प्रार्थना केली.

नववर्षाची सुरुवात होतीये ती गुरुवारने. त्यामुळे साईबाबांच्या दर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात करता यावी, यासाठी लाखो साईभक्तांनी शिर्डीत गर्दी केलीय. २०१४ ची शेवटची रात्र आणि नव्या वर्षीची पहाटेची सुरवात शिर्डीत होवो यासाठी कालपासून साईभक्तानी शिर्डीत गर्दी केली होती. नविन वर्षाचा पहिला दिवस हा साईबाबांचा गुरूवारच आल्याने आजच्या गर्दीत आधिकच भर पडली. या गुरूपुष्यामृताच्या मुहूर्तावर साईंचं दर्शन घेण्यात अनेकांनी धन्यता मानली.

साईंच्यां दर्शनसाठी भाविक मोठ्या प्रमाणात पायी चालत शिर्डीला आले आहेत. थर्टी फस्ट आणि नविन वर्षाची सुरुवात पहाता भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी रात्रभर साईमंदिर भक्तांसाठी खुलं ठेवण्यात आलं होतं.. यावेळी साईंच्या मूर्तीला सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आलं. तर मंदिरही विद्युत रोषणाई आणि फुलांच्या आकर्षक सजावटीनं सजलंय.

नववर्षाचं स्वागत देश उत्साहात साजरं करत असताना, मुंबईतलं एस्सेल वर्ल्ड तरी यात कसं मागे राहिल. एस्सेल वर्ल्डमध्ये नाचगाण्यांसहित मोठ्या धूमधडाक्यात 2015 च्या आगमनाचा उत्सव पाहायला मिळाला. डीजे रामजी गुलाटी, डीजे गौरव, यांच्या रंगारंग कार्यक्रमानं वातावरण आणखीनच रंगतदार केलं. यावेळी एस्सेल वर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा उपस्थित होते. लवकरच एस्सेल वर्ल्डमध्ये दोन नव्या राईड सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नेहमीच तो येतो, सुमारे बारा तास राहतो आणि निरोपही घेतो. मात्र निरोप असतो पुन्हा येण्यासाठी... त्याचं असणंच सारं काही आहे. आणि त्याचं नसणं ही कल्पनाच करवत नाही. तो सूर्य प्रत्येक दिवसाचा साक्षीदार आहे. म्हणूनच भविष्यातल्या अनेक आशाआकांक्षांना घेऊन आलेल्या नव वर्ष २०१५ची सुरुवात सूर्यदर्शनानं करण्याचा, अनेकांनी आवर्जून योग साधला. वर्षाच्या या पहिल्या दिवशी आकाश उजळण्याआधी पहाटेच उठून, बहुतेक लोकं घराबाहेर पडली. मोकळ्या हवेत आणि प्रसन्न वातावरणात चराचरालासंजीवनी देणा-या सूर्याचं त्यांनी दर्शन घेतलं. सर्वांना ऊर्जा देणा-या सूर्याकडून यावेळी अमर्याद चैतन्य आणि आल्हादक प्रसन्नता लोकांनी टिपून घेतली नसेल तरच नवल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.