चिरंतन पुरातन युतीत आता 'अबोला'

महायुतीत धुसफूस असल्याचं आता आणखी समोर येतंय. कारण भाजपने आता जागावाटपावर शिवसेनेशी बोलणी बंद केली आहे. भाजप प्रवक्त माधव भांडारी यांनी ही माहिती दिली आहे. 

Updated: Sep 14, 2014, 05:13 PM IST
चिरंतन पुरातन युतीत आता 'अबोला' title=

मुंबई : महायुतीत धुसफूस असल्याचं आता आणखी समोर येतंय. कारण भाजपने आता जागावाटपावर शिवसेनेशी बोलणी बंद केली आहे. भाजप प्रवक्त माधव भांडारी यांनी ही माहिती दिली आहे. 

महायुतीत भाजप आणि शिवसेनेतून अजूनही जागावाटपावरून कोणताही निर्णय होतांना दिसत नाहीय. दुसरीकडे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे, महायुतीच्या घरातील भांडाभांडीचा गोंधळ आणखी वाढत चाललाय.

नरेंद्र मोदी नेतृत्वाला कमी लेखण्याचा प्रकार पुन्हा पुन्हा शिवसेना नेत्यांकडून होत आहे. या बाबतीत काहीही खपवून घेतलं जात आहे. नरेंद्र मोदींची लोकसभा निवडणुकीत लाट नव्हती, असं बोललं जातंय, याची मोठी आणि विलक्षण नाराजी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. नाराज कार्यकर्त्यांकडून नाराजी बोलणी न करण्याची मागणी वेळोवेळी होतेय, याचा विचार करणे गरजेचं होतं, म्हणून ही वाटाघाटी थांबवल्याचं भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटलं आहे.

भाजपचं हे दबावतंत्र आहे का? यावर माधव भांडारी यांनी म्हटलंय की,  भाजपला दबावतंत्र वापरण्याची सवय नाही. मोदींच्या नेतृत्वाला कमी लेखणं हा महत्वाचा मुद्दा आहे, वाटाघाटीचा नाही असं माधव भांडारी यांनी म्हटलंय.

भाजपने शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी जागावाटपावर चर्चा बंद झाली आहे. भाजप आणि शिवसेनेची युती चिरंतन आणि पुरातन मानली जाते, मात्र पहिल्यांदा चर्चा बंद झाल्याचं समोर आलं आहे. २६ वर्षाच्या या युतीत ऐनवेळेस अबोला निर्माण होण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.