पाकिस्तान भारतात प्रत्येक घरात पाठवतोय 'नोट बॉम्ब'

भारताची अर्थव्यवस्था ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची मजबूत अर्थव्यवस्था सध्या मानली जात आहे. ही अर्थव्यवस्था कमकूवत करण्याची योजना पाकिस्तानने आखली आहे. 

Updated: Oct 14, 2015, 09:35 AM IST
पाकिस्तान भारतात प्रत्येक घरात पाठवतोय 'नोट बॉम्ब' title=

मुंबई : भारताची अर्थव्यवस्था ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची मजबूत अर्थव्यवस्था सध्या मानली जात आहे. ही अर्थव्यवस्था कमकूवत करण्याची योजना पाकिस्तानने आखली आहे. 

यासाठी पाकिस्तानचा 'क्रॉस बॉर्डर ग्रीन टेरर'ची योजना बनवली आहे. हा प्लान यशस्वी करण्यासाठी पाकिस्तानच्या आएएसआएने प्रयत्न सुरू केले आहेत.

भारतात दुबईच्या मार्गाने सर्वात जास्त नकली नोटा पाठवल्या जात आहेत. पाकिस्तानने हा आर्थिक दहशतवाद दुबईच्या मार्गाने भारतात घुसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. देशात दरवर्षी ७० कोटी रूपयांच्या नकली नोटा येत आहेत.

तुमच्या खिशात ५०० आणि १००० रूपयाची नोट नकली असू शकते, आणि ते बनावट चलन तुम्हाला जेलमध्येही पाठवू शकतं.

मात्र नकली नोट ओळखणे तसं कठीण नाहीय. नकली नोटा ओळखण्याचं तंत्र जाणून घेतलं तर बनावट नोटा भारतात पाठवणाऱ्यांचं धाबं दणाणणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.