रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग महागणार

मुंबईत रेल्वे स्टेशनवर गाडी पार्क करणाऱ्यांच्या खिशाला आता चांगलाच फटका बसणार आहे. 

Updated: Oct 19, 2015, 12:25 PM IST
रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग महागणार  title=

मुंबई : मुंबईत रेल्वे स्टेशनवर गाडी पार्क करणाऱ्यांच्या खिशाला आता चांगलाच फटका बसणार आहे. 

दिवसभरासाठी गाडी पार्क करायची असेल तर 50ची अख्खी नोट खर्च करावी लागण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात मध्यरेल्वेच्या स्थानकांमध्ये असणारं पार्किंग आता महागण्याची चिन्हं आहेत. याबद्दलची अधिकृत निविदा किंवा घोषणा करण्यात आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याचे 20 ते 30 रुपये दर पार्किंगच्या कंत्राटदारांना परवडत नाहीत, अशी ओरड आहे. त्यामुळे बहुतांश पार्किंग कंत्राटदार आपलं काम सोडण्याची तयारी करत आहेत. 

याच पार्श्वभूमीवर नव्या निविदा काढताना हा दर रेल्वे प्रशासन वाढवून देईल अशी माहिती मिळत आहे. अद्याप यासंदर्भात कुठलाही लेखी निर्णय झालेला नाही. पण वाढीव दरानं नव्या निविदा लवकरच काढण्यात येतील असं सूत्रांचं म्हणणं आहे. मध्यरेल्वेच्या या कंत्राटदार धार्जिण्या धोरणाला प्रवासी संघटना मात्र विरोध करण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.