बीसीसीआयमध्ये धुडगूस घालणाऱ्या १० शिवसैनिकांना अटक

मुंबईत आज रद्द झालेली पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यातली बैठक आज दिल्लीत होणार आहे. मुंबईत बीसीसीआयच्या कार्यालयात धुडघुस घालून शिवसैनिकांनी पाक विरोधी भूमिका घेतली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी १० शिवसैनिकांना अटक केली आहे. 

Updated: Oct 19, 2015, 04:09 PM IST
बीसीसीआयमध्ये धुडगूस घालणाऱ्या १० शिवसैनिकांना अटक title=

मुंबई : मुंबईत आज रद्द झालेली पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यातली बैठक आज दिल्लीत होणार आहे. मुंबईत बीसीसीआयच्या कार्यालयात धुडघुस घालून शिवसैनिकांनी पाक विरोधी भूमिका घेतली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी १० शिवसैनिकांना अटक केली आहे. 

बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि शहरायार खान यांच्या आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आलाय. 

आज सकाळी पाकविरोधी भूमिकेतून शिवसेनेचे कार्यकर्ते बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या कार्यालयात घुसले. त्यानंतर मुंबईतली बैठक रद्द करून दिल्लीत घेण्यात येणार आहे. 

शिवसेनेच्या पाक विरोधी भूमिकेचा फटका आज बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर यांना बसलाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान आज मनोहर यांच्या भेटीला मुंबईत आहेत.

त्याविरोधात आज दक्षिण मुंबईतल्या शिवसैनिकांनी आज बीसीसीआयच्या मध्यवर्ती कार्यालयात घुसून निषेध केला. शशांक मनोहर यांच्या कार्यालयात जवळपास शंभर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली....

यानंतर शिवसैनिकांनीच दिलेल्या माहितीनुसार शहरयार खान यांच्याशी होणारी बैठक मनोहर यांनी रद्द केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.