पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर ट्रेनचा खोळंबा...

मुंबईत मे महिन्यात अवकाळी म्हणा किंवा वळवाचा पाऊस म्हणा... पण पावसाचे शिंतोडे पडले... आणि मध्य रेल्वेनं अंग टाकलं... 

Updated: May 13, 2017, 12:14 AM IST
पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर ट्रेनचा खोळंबा...  title=

मुंबई : मुंबईत मे महिन्यात अवकाळी म्हणा किंवा वळवाचा पाऊस म्हणा... पण पावसाचे शिंतोडे पडले... आणि मध्य रेल्वेनं अंग टाकलं... 

शुक्रवारी रात्री उशिरा मध्य रेल्वे पुन्हा एकदा खोळंबलीय. अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. वीजप्रवाह खंडीत झाल्यानं मध्य रेल्वेमार्गावरच्या अनेक गाड्या बंद पडल्यात. त्यामुळे, घरी उशीरा पोहचणारे प्रवासी मध्येच अडकून पडलेले दिसत आहेत. 

परंतु, पावसाला सुरुवातही झाली नसताना मध्य रेल्वेमार्गावर झालेला हा खोळंबा पावळ्यात प्रवाशांना काय काय सहन करावं लागू शकतं, याची चुणूक दाखवायला पुरेसा ठरलाय... आणि म्हणूनच प्रवासी चांगलेच धास्तावलेत.