रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...

तुम्ही जर रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी रेल्वेनं दिलेला हा 'जोर का धक्का' तुम्हालाही लागण्याची शक्यता आहे.

Updated: Nov 14, 2015, 10:21 PM IST
रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...  title=

मुंबई : तुम्ही जर रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी रेल्वेनं दिलेला हा 'जोर का धक्का' तुम्हालाही लागण्याची शक्यता आहे.
 
मुंबईतल्या लोकल ट्रेनच्या पहिल्या वर्गाच्या पास दरात पंधरा नोव्हेंबरपासून वाढ होत आहे. कमीत कमी पाच रुपये ते जास्तीत जास्त तीस रुपये अशी ही दरवाढ असणार आहे. 

स्वच्छ भारत योजनेसाठी उपकर लावण्यात आला आहे.  त्या उपकराचा भार रेल्वेवरही टाकण्यात आलाय. त्यामुळे ही दरवाढ होत आहे. 

दरम्यान,  रेल्वे प्रवासी संघटनांनी या दरवाढीला विरोध केला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.