राज ठाकरे कडाडले... खड्डे सारखे सारखे का पडतात?

मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये वारंवार खड्डे का पडतात, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Updated: Oct 8, 2012, 03:35 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये वारंवार खड्डे का पडतात, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई महापालिकेतील खड्डे बुजविण्याच्या यंत्रणेचं म्हणजेच पोर्ट ट्रॅकिंग सिस्टमचं प्रेझंटेशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.
यावेळी राज ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं. वाढते खड्डे आणि कंत्राटदारांचं गौडबंगाल याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही राज म्हणालेत..