'मनसेच्या झेंडयात हिरवा रंग राष्ट्रभक्त मुस्लिमांसाठी'

देश हिताचा विचार करणाऱ्या मुस्लिमांसाठी मनसेच्या झेंड्यातील हिरवा रंग आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय.

Updated: Jan 7, 2016, 10:05 PM IST
'मनसेच्या झेंडयात हिरवा रंग राष्ट्रभक्त मुस्लिमांसाठी' title=

मुंबई : देश हिताचा विचार करणाऱ्या मुस्लिमांसाठी मनसेच्या झेंड्यातील हिरवा रंग आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय.

राज ठाकरेंना रुईया कॉलेजात एका विद्यार्थ्याने याविषयी प्रश्न विचारला होता, त्यावर बोलताना राज यांनी, मनसेच्या झेंडयातील हिरवा रंग भारताला मानणाऱ्या मुस्लिमांसाठी असल्याचं म्हटलं आहे.

आज पत्रकारितेच्या क्षेत्रात जी आव्हान आहेत त्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी न्यूज चॅनेल्स, वर्तमानपत्र आणि सोशल मीडियाचा आढावा घेतला. 

इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडीयामध्ये पत्रकारांची संख्या कमी केली जात आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रकुशलता आत्मसात करुन बदलत्या माध्यमांचा अभ्यास करायला हवा, असा सल्ला राज यांनी दिला. 

माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयात मास मिडियाच्या अभ्यासक्रमाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कलाकारण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये राज यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.