मुंबई : महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मीडियाला एक अनोखा सल्ला दिला आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्यांना अधिक प्रसिद्धी दिल्याने, आरोपींचे मनोबल वाढतं, त्यामुळे अशा बातम्या दाखवू नका, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी दिला आहे.
मीडियाला अशा बातम्यांना टाळता आलं पाहिजे, जे आरोपींचं महत्व वाढवतात, यामुळे आरोपींना आपण हिरो असल्यासारखं वाटतं.
पंकजा मुंडे म्हणाल्या, महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक निश्चित योजना आखली पाहिजे, कारण समाजात गुन्हेगारी मनोवृत्ती फोफावतेय, महिलांची स्थिती पाहावली जात नाही, दिवसेंदिवस ती आणखी बिकट होत चालली आहे, लहान मुली काय?, मुलंही सुरक्षित नाहीत, माझ्या मतदारसंघातही अशी घटना घडलीय की, पित्यानेच मुलीवर बलात्कार केला आहे'.
पंकजा पुढे म्हणाल्या, "जेव्हा एक पिता असं करू शकतो, त्यापेक्षा वाईट काय असू शकतं, मला वाटतं की, अशा बातम्यांना जास्त प्रसिद्धी देण्यात येऊ नये, यामुळे आरोपींना हिरो झाल्यासारखं वाटतं, त्यांना यापासून उर्जा मिळते, एखादी बातमी देण्याआधी बातमीची संवेदनशीलता समजून घेतली पाहिजे."
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.