गूड न्यूज: मुंबईतील घराच्या मालमत्ता करात वाढ नाही

मुंबईकरांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.  

Updated: May 28, 2015, 01:56 PM IST
गूड न्यूज: मुंबईतील घराच्या मालमत्ता करात वाढ नाही  title=

मुंबई : मुंबईकरांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.  

मुंबईत ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरात राहणाऱ्यांच्या मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुंबई महानगर पालिकेनं राज्य सरकारला असा प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. 

लहान क्षेत्रफळाच्या घरात राहणाऱ्या मुंबईकरांवर वाढीव मालमत्ता कराचा बोजा पडू नये, यासाठी त्यांना मालमत्ता करवाढीतून वगळण्याचा निर्णय पालिकेनं घेतला होता.

आधीच्या सरकारच्या काळातही पाच वर्षांसाठी ही सूट देण्यात आली होती आणि ती आणखी पाच वर्षांसाठी देण्याचा प्रस्ताव होता. सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा फायदा सुमारे १६ लाख ७९ हजार सदनिकाधारकांना होईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.