सचिन तेंडुलकरने मतदान केलं, तुम्ही केलं का?

भारतरत्न सचिन तेंडुलकरनं मतदानाचा हक्क बजावलाय. वांद्रेमधल्या मतदान केंद्रावर जाऊन सचिननं पत्नी डॉक्टर अंजलीसह मतदान केलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 23, 2017, 07:57 AM IST
सचिन तेंडुलकरने मतदान केलं, तुम्ही केलं का? title=

मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकरनं मतदानाचा हक्क बजावलाय. वांद्रेमधल्या मतदान केंद्रावर जाऊन सचिननं पत्नी डॉक्टर अंजलीसह मतदान केलं. सगळ्यांनी घराबाहेर पडा आणि मतदान करा, असं आवाहन सचिननं यावेळी केलं. माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईतल्या वरळी इथे मतदानाचा अधिकार बजावला. 

प्रत्येकानं मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे. अन्यथा नंतर तक्रार करण्यात काही अर्थ नाही, असं मत दिलीप वेंगसरकर यांनी यावेळी मांडलं. माजी क्रिकेटर संदीप पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. पाटील यांनी दादरच्या बालमोहन शाळेत मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर मुंबईकरांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.