`पाक कलावंतांना आमंत्रित करणाऱ्यांनाही इंगा दाखवू`

पाकिस्तानी कलावंतांना शिवसेनेचा विरोध आहेच, मात्र यापुढे त्यांना आमंत्रित करणाऱ्यांनाही शिवसेना इंगा दाखवेल असा इशारा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

Updated: Mar 16, 2013, 09:23 PM IST

www.24taas.com, मुंबई
पाकिस्तानी कलावंतांना शिवसेनेचा विरोध आहेच, मात्र यापुढे त्यांना आमंत्रित करणाऱ्यांनाही शिवसेना इंगा दाखवेल असा इशारा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेने पाकिस्तान कलाकारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
श्रीनगरमध्ये दहशदवाद्यांनी हल्ला केला होता. बिमना परिसरातल्या शाळेबाहेर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले होते. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सीआरपीएफच्या जवानांना यश आलं होतं.