शेअर बाजारात आपटी, सेन्सेक्स-निफ्टी कोसळले

सेन्सेक्स आणि निफ्टी आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोसळले. ५६३ अंशांनी कोसळत सेन्सेक्स २५२०१ अंशांवर बंद झाला. 

PTI | Updated: Sep 4, 2015, 11:26 PM IST
शेअर बाजारात आपटी, सेन्सेक्स-निफ्टी कोसळले title=

मुंबई : सेन्सेक्स आणि निफ्टी आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोसळले. ५६३ अंशांनी कोसळत सेन्सेक्स २५२०१ अंशांवर बंद झाला. 

तब्बल २ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. तर निफ्टीही १६७ अंशानी कोसळत ७६५५ अंशांवर बंद झाला. जागतिक बाजारातली घसरण आणि अमेरिकतला जॉब रिपोर्ट कसा असेल या भीतीने ही घसरण झाल्याचं तज्ज्ञ सांगतात.

बाजार उघडताच १०० अंशांनी गडगडलेल्या सेन्सेक्सने पुढच्या काही मिनिटांतच ५००अंशांच्या घसरणीचा टप्पा ओलांडला. गुंतवणूकदारांनी नफेखोरीसाठी समभाव विक्रीचा सपाटा लावल्यामुळे शेअर बाजाराने गेल्या १४ महिन्यातली निचांकी पातळी गाठली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.