वेगळ्या विदर्भच्या मुद्द्यावरुन विधानसभेत गदारोळ

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी अखंड महाराष्ट्राबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितली. 

Updated: Aug 1, 2016, 12:19 PM IST
वेगळ्या विदर्भच्या मुद्द्यावरुन विधानसभेत गदारोळ title=

मुंबई : वेगळ्या विदर्भाचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी अखंड महाराष्ट्राबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितली. 

याबाबत सभागृह संपण्याआधी भूमिका स्पष्ट करु असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मात्र वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हा आमचा असल्याचं सांगत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला.

अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्याबाबत शिवसेना आणि भाजमध्ये फिक्सिंग असल्याचा आरोप यावेळी विखेपाटलांनी केला.