मालेगाव घटनेसाठी भगवा आतंकवाद शब्द वापरला होता - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारविषयी आणि विश्वासमताविषयी आपली भूमिका मांडली. आम्हाला राज्यात स्थिरता हवी आहे, त्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका आहे, असं पवार म्हणाले. 

Updated: Nov 10, 2014, 06:04 PM IST
मालेगाव घटनेसाठी भगवा आतंकवाद शब्द वापरला होता - शरद पवार title=

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारविषयी आणि विश्वासमताविषयी आपली भूमिका मांडली. आम्हाला राज्यात स्थिरता हवी आहे, त्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका आहे, असं पवार म्हणाले. 

दरम्यान, भगवा आतंकवाद हा शब्द मीच वापरला असं म्हणत मालेगावच्या घटनेसाठी भगवा आतंकवाद हा शब्द वापरला होता, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.मालेगाव बाँबस्फोटांच्या वेळी मी भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग केला होता असे स्पष्ट करतानाच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा द्यावा यासाठी मी मातोश्रीवर गेलो होतो तेव्हा भगवा दहशतवाद विसरला होता का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला विचारला आहे. 

सरकार पडू नये यासाठी पाठिंब्याची भूमिका, मात्र प्रत्येक मुद्यावर पाठिंबा देऊ असं नाही, आम्हाला कोणीही पाठिंबा मागायला आलं नाही, असंही पवारांनी स्पष्ट केलं. आम्ही कोणाला मतदान करावं याचा सल्ला आम्हाला कोणीही देऊ नये, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. 
 
विशेष म्हणजे हे सरकार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप होतात. आता केंद्र आणि राज्यात त्यांची सत्ता आहे.  काय आहे त्याची चौकशी व्हावी, असं पवार म्हणाले. पण यावेळी हे सरकार ५ वर्ष स्थिर राहिल असं मी म्हटलं नाही, असा अखेरचा वारही पवारांनी केला. 

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -
 

  • काँग्रेसनेही समन्वयाची भूमिका घेतल्याची दिसते आहे
  • विधानसभेत आमची संख्या कमी आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवणे योग्य नाही
  • आम्ही विधानसभेसाठी उमेदवार देणार नाही, विधानसभेत आमची संख्या कमी आहे
  • मालेगाव घटनेसाठी भगवा आतंकवाद हा शब्द वापरला होता
  • आम्हाला कोणीही पाठिंबा मागायला आलं नाही
  • आम्ही कोणाला मतदान करावं याचा सल्ला आम्हाला कोणी देऊ नये
  • सरकार पडू नये यासाठी पाठिंब्याची भूमिका, मात्र प्रत्येक मुद्यावर पाठिंबा देऊ असे नाही
  • सरकार बनविण्याचा आम्हाला अधिकार नाही 
  • आम्हाला राज्यात स्थिरता हवी आहे, त्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका 
  • राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईत पत्रकार परिषद

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.