पवारांच्या बारामतीत विराट मराठा क्रांती मोर्चा

पवारांच्या बारामतीत विराट मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन आज पवारांचा बालेकिल्ला बारामतीत  करण्यात आलं होते.. या मोर्चात पवार कुटुंबियांसह बारामती आणि आसपासच्या तालुक्यातील मराठा बांधव सहभागी झाले होते. 

पाकिस्तानला कारगिलसारखंच उत्तर द्या : शरद पवार

पाकिस्तानला कारगिलसारखंच उत्तर द्या : शरद पवार

उरीच्या दहशतवादी हल्ल्याला कारगिलसारखंच उत्तर देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री असताना आक्रमक भाषा वापरणारे मोदी आता अनुभवातून शहाणे झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

मराठा आरक्षणावर तातडीने निर्णय घ्या : शरद पवार

मराठा आरक्षणावर तातडीने निर्णय घ्या : शरद पवार

मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेऊन सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मात्र इतर समाजांच्या हक्कांवर गदा येणार नाही याची दक्षताही घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे. 

शरद पवारांवर आशिष शेलार यांची आगपाखड

शरद पवारांवर आशिष शेलार यांची आगपाखड

 मराठा समाजाच्या मोर्चा प्रकरणात शरद पवारांवर आशिष शेलार यांनी टीका केलीय. पवारांनी या प्रकरणात विनाकारण लुडबूड थांबवावी, अशी आगपाखड शेलार यांनी केली. आधीच्या सरकारने मराठा समाजाचे प्रश्न समजून घेतले नाहीत म्हणून ही परिस्थिती आल्याचं ते म्हणाले. 

मराठा आरक्षणासंदर्भात बोलून सहानभूती नको, कृती करा : शरद पवार

मराठा आरक्षणासंदर्भात बोलून सहानभूती नको, कृती करा : शरद पवार

मराठा आरक्षणासंदर्भात बोलण्यापेक्षा कृतीची जास्त गरज आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. या सरकारने मराठा समाजाचे प्रश्न समजून घेतले नाहीत म्हणून ही परिस्थिती आली आहे, असे मराठा मोर्चावरुन सरकारचे कान टोचले.

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

राज्यातला साखरेच्या साठ्यावरील मर्यादा काढण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.

'समाजामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळे समाज नाही'

'समाजामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळे समाज नाही'

शरद पवारांनी एट्रोसिटी कायद्याबाबत घेतलेल्या भूमिकेसंदर्भात, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे विचारले असता राज म्हणाले, कोण काय म्हटलं याच्याशी आपल्याला देणंघेणं नाही. 

सुशीलकुमार शिंदेंचं कौतुक करताना पवारांचा काँग्रेसवर निशाणा

सुशीलकुमार शिंदेंचं कौतुक करताना पवारांचा काँग्रेसवर निशाणा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आज सोलापुरात सत्कार करण्यात आला. सुशील कुमार शिंदे यांचा अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या हस्ते सुशीलकुमार शिंदेंचा सत्कार करण्यात आला. 

'राज्याला पवारनिती माहिती आहे'

'राज्याला पवारनिती माहिती आहे'

ऍट्रोसिटी कायद्याबाबत पवारांनी आपली भूमिका स्पष्ट मांडावी. राज्याला पवार निती नेमकी माहिती आहे

पवारांनी धोका ओळखला पाहिजे - मुख्यमंत्री

पवारांनी धोका ओळखला पाहिजे - मुख्यमंत्री

एटीएस विनाकारण मुस्लीम तरुणांना त्रास देत आहे, हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य चुकीच्या माहितीवर आधारित आहे. पवारांकडे योग्य माहिती नाही, असं माझं मत आहे. त्यांना योग्य माहिती पाठविण्यात येईल... असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटंलय. 

अॅट्रॉसिटी... काडी टाकली... मुद्दा पेटला... पवारांनी घुमजाव केलं!

अॅट्रॉसिटी... काडी टाकली... मुद्दा पेटला... पवारांनी घुमजाव केलं!

राज्यात सध्या अॅट्रॉसिटीच्या कायद्यावरून उठलेल्या वादळाविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपली भूमिका स्पष्ट केली. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा असं म्हटलं नाही असं पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं. शिवाय जर राज्यात कायद्याच्या विरोधात मोर्चे निघत असतील, तर त्यात सरकारनं लक्ष घालावं असंही पवारांनी म्हटलं. अॅट्रॉसिटीच काय इतर कुठल्याही कायद्याचा गैरवापर होता कामा नये असही पवारांनी म्हटलं. 

 संशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे : शरद पवार

संशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे : शरद पवार

मुस्लिम संघटनांनी आधीच इसिसचा निषेध केला आहे. मात्र, संशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे आहे, अटक केली तर २४ तासात त्यांना कोर्टात हजर करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.

'अॅट्रॉसिटी कायद्याबाबत विचारमंथन झालं पाहिजे'

'अॅट्रॉसिटी कायद्याबाबत विचारमंथन झालं पाहिजे'

अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सुरु असलेल्या वादामध्ये आता शरद पवारांनीही उडी घेतली आहे.

'तर कॅन्सरच्या बापापासूनही सुटका मिळवता येते'

'तर कॅन्सरच्या बापापासूनही सुटका मिळवता येते'

कॅन्सरशी कुस्तीसारखी लढाई केली तर कॅन्सरपासूनच काय पण त्याच्या बापापासून देखील सुटका मिळवता येते असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

'कांद्यावरून सरकारचं गांभीर्य कळलं'

'कांद्यावरून सरकारचं गांभीर्य कळलं'

कांद्याबाबत सध्या सर्वाधिक धक्कादायक स्थिती आहे असं म्हणून शरद पवारांनी सरकारवर तोफ डागली आहे.

हा देश मुख्यमंत्र्यांच्या खाजगी मालकीचा आहे का?

हा देश मुख्यमंत्र्यांच्या खाजगी मालकीचा आहे का?

पुणे : गाईला आई म्हणत नसेल, तर त्याने देशात राहु नये, असं एका मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य वाचलं. मात्र हे सांगण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला...?, असा सवाल शरद पवार यांनी विचारलाय.

'न्यूज अँकरचे पगार मला माहिती आहेत'

'न्यूज अँकरचे पगार मला माहिती आहेत'

विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदारांच्या वेतनात वाढ करण्याबाबतचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं.

'उस्मानाबाद बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा'

'उस्मानाबाद बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा'

उस्मानाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी

वेगळ्या विदर्भासाठी जनमत घ्या - शरद पवार

वेगळ्या विदर्भासाठी जनमत घ्या - शरद पवार

वेगळा विदर्भ हवा असेल तर जनमत घ्यावं लागेल, जनमताशिवाय वेगळ्या विदर्भाची मागणी करणं हा विदर्भावर अन्याय आहे असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. 

शरद पवारांनी कोपर्डीत जाऊन घेतली पीडित कुटुंबाची भेट

शरद पवारांनी कोपर्डीत जाऊन घेतली पीडित कुटुंबाची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगरमध्ये कोपर्डीत जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली.

सहा महिन्यात एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा देणार -  शरद पवार

सहा महिन्यात एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा देणार - शरद पवार

येत्या सहा महिन्यात एमसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं शरद पवार यांनी आज जाहीर केलंय. वेळ आल्यावर निश्चित तारीख जाहीर केली जाईल असं शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केलं.