शिवसेनेच्या धरसोड भूमिकेवर आमदारांचा मोठा गट नाराज

शिवसेनेच्या धरसोड भूमिकेमुळे शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेनेची भूमिका ठरवतांना आमदारांची मतं विचारात न घेतल्याने आमदारांमध्ये नाराजी वाढच चालली आहे. शिवसेनेचा हा नाराज गट मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Updated: Nov 12, 2014, 11:11 AM IST
शिवसेनेच्या धरसोड भूमिकेवर आमदारांचा मोठा गट नाराज title=

मुंबई : शिवसेनेच्या धरसोड भूमिकेमुळे शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेनेची भूमिका ठरवतांना आमदारांची मतं विचारात न घेतल्याने आमदारांमध्ये नाराजी वाढच चालली आहे. शिवसेनेचा हा नाराज गट मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे. 

विश्वासदर्शक ठरावाला काही वेळ राहिला असतांना शिवसेना आमदारांचा मोठा गट नाराज असल्याचं सांगण्यात येत असलं तरी फुटाफुटीची शक्यता मात्र नाहीय, कारण हे मतदान उघड-उघड असल्याने शिवसेनेचे आमदार पक्षविरोधी भूमिकेत मतदान करणार नाहीत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी सकाळी आपण भाजपच्या विरोधात बसणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेत्यांना फोन करून चर्चेसाठी बोलावलं, यानंतर रामदास कदम आणि मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि ती निष्फळ ठरली, यानंतर पुन्हा दिवाकर रावते आणि रामदास कदम हे मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी दालनात गेले असल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.