माणुसकीला काळिमा : भटक्या कुत्र्यांना विष देऊन केलं ठार

दहिसरमधील कृष्णा वाटीका सोसायटीत भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारल्याचा प्रकार समोर आलाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. याप्रकरणी सोसायटीतील राजेश वर्माविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आलाय.

Updated: May 20, 2017, 11:41 PM IST
माणुसकीला काळिमा : भटक्या कुत्र्यांना विष देऊन केलं ठार title=

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : दहिसरमधील कृष्णा वाटीका सोसायटीत भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारल्याचा प्रकार समोर आलाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. याप्रकरणी सोसायटीतील राजेश वर्माविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आलाय.

दहिसर पूर्व आनंदनगर येथील कृष्णा वाटिका सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर स्वत:ला माणूस म्हणवून घ्यायलाही तुम्हाला लाज वाटेल... या सोसाटीत भटके कुत्रे विष कालवेलंलं अन्न खाताना या व्हिडिओमध्ये दिसत... या सोसाटीत गेल्या काही दिवसांपूर्वी २० ते २५ कुत्रे होते. मात्र त्यांची संख्या आता तीनवर आलीय. 

मात्र, या कुत्र्यांचा मृत्यू कशामुळे होतोय? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला होता. यासाठी सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले... आणि त्या सीसीटीव्हीत हे धक्कादायक कृत्य समोर आलं. सोसायटीतील राजेश वर्मा हा व्यक्ती अशा प्रकारे विष कालवलेलं जेवण कुत्र्यांना देत असल्याचं वास्तव समोर आलंय. याविरोधात सोसायटीतील नागरिकांनी पोलिसांत तक्रार नोंदवलीय. 

याच भटक्या कुत्र्यांनी 2014 मध्ये चड्डी बनियान गँगपासून येथील नागरिकांचं संरक्षण केलं होतं. त्या मुक्या जनावरांचा अश्याप्रकारे जीव घेतला जात असल्याने सोसायटीतील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.