ऑस्कर फेम सनी पवार राज ठाकरेंच्या भेटीला

हॉलिवूडच्या लायन द किंग चित्रपटातील बालकलाकार ऑस्कर फेम सनी पवार आणि त्याच्या कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Updated: Mar 4, 2017, 08:59 PM IST
ऑस्कर फेम सनी पवार राज ठाकरेंच्या भेटीला title=

मुंबई : हॉलिवूडच्या लायन द किंग चित्रपटातील बालकलाकार ऑस्कर फेम सनी पवार आणि त्याच्या कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. सनी आणि त्याचे आई-वडील कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांना भेटले.

ऑस्कर दरम्यान रेड कार्पेटवर वावरणारा सनी राज यांच्यासोबतही मनमोकळ्या गप्पा मारताना दिसला. यावेळी राज यांनीही सनीला जवळ घेत त्याचं भरभरुन कौतुक केलं. त्याचबरोबर सनीला राज ठाकरेंनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.