मुंबईत गेल्या दशकातील दुसरं उच्चांकी तापमान

सुखद गारवा आणि गुलाबी थंडीचा आनंद घेणा-या मुंबईकरांना आता उन्हाचे चटके बसतायत. शनिवारी मुंबईत गेल्या दशकातील दुसरं उच्चांकी तापमान नोंदवलं गेलंय.

Updated: Feb 19, 2017, 12:11 PM IST
मुंबईत गेल्या दशकातील दुसरं उच्चांकी तापमान  title=

मुंबई : सुखद गारवा आणि गुलाबी थंडीचा आनंद घेणा-या मुंबईकरांना आता उन्हाचे चटके बसतायत. शनिवारी मुंबईत गेल्या दशकातील दुसरं उच्चांकी तापमान नोंदवलं गेलंय.

मुंबईत शनिवारी 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तर किमान तापमान 19.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. याआधी 2015 सालातही 23 फेब्रुवारीला 38.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. 

पूर्वेकडून वाहत असलेल्या वा-यांमुळे तापमानात वाढ झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिलीय. पुढील काही दिवस हा उष्मा मुंबईकरांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्याच्या अखेरीस तापमान हळुहळू पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जातेय.