मुंबईच्या तापमानात वाढ

राज्यात थंडीनं रामराम ठोकल्याचं आता तापमान केंद्रवर नोंद झालेल्या आकडेवारीनं स्पष्ट झालंय.

Updated: Feb 16, 2017, 09:01 AM IST
 मुंबईच्या तापमानात वाढ title=

मुंबई : राज्यात थंडीनं रामराम ठोकल्याचं आता तापमान केंद्रवर नोंद झालेल्या आकडेवारीनं स्पष्ट झालंय.

मुंबईत काल सरासरीपेक्षा पाच अंश अधिक तापमान नोंदवण्यात आलं. सांताक्रूझमध्ये कमाल तापमान 37.2 अंश तर कुलाब्यातलं कमाल तापमान 36.9 अंश सेल्शियसवर पोहचलं. 

पुढचे तीन ते पाच दिवस पारा असाच चढा राहील असं हवामान खात्यानं म्हटलंय.  पारा चढण्याची प्रक्रिया कोकणातल्या बहुतांश भागात सुरू झालीय. तिकडे मराठवाडा, विदर्भातही पारा चढाचा राहणार आहे.