सरकारने मंत्रालयाला आग लावली - खडसे

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या मुद्यावर... आगीच्या मुद्यावर आज विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. घोटाळ्याच्या फाईल्स जाळण्यासाठी सरकारने मंत्रालयाला आग लावल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला.

Updated: Jul 9, 2012, 10:05 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या मुद्यावर. आगीच्या मुद्यावर आज विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. घोटाळ्याच्या फाईल्स जाळण्यासाठी सरकारने मंत्रालयाला आग लावल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला.

 

विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनी आगीच्या मुद्यावर स्थगन प्रस्तावा अंतर्गत चर्चा घेण्याची मागणी करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विधानसभा अध्यक्षांनी विरोधकांची मागणी फेटाळल्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झाले. शेवटी मुख्यमंत्र्यांनी आगीबाबत चर्चा करण्याची तयारी दर्शवल्यानंतर उद्या या विषयावर चर्चा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभेत आगीच्या मुद्यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले.

 

तत्पूर्वी सकाळी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर विरोधक आमदारांनी आंदोलन केलं. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात भाजप, शिवसेना आणि मनसेचेही आमदार सहभागी झाले होते. तर विधानपरिषदेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलयं.

 

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="135941"]