राज ठाकरेही उसाच्या फडात

आमदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसदरवाढ आंदोलनाला शिवसेनेपाठोपाठ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माम सेनेनेही पाठिंबा दिला आहे. यासाठी मनसेच्या आमदारांचे शिष्टमंडळ पाठिंब्यासाठी बारामतीला रवाना झाले आहे.

Updated: Nov 8, 2011, 12:33 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

आमदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसदरवाढ आंदोलनाला शिवसेनेपाठोपाठ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माम सेनेनेही पाठिंबा दिला आहे. यासाठी मनसेच्या आमदारांचे शिष्टमंडळ पाठिंब्यासाठी बारामतीला रवाना झाले आहे.

आज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उसाच्या दरासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर लगेच मनसेनेही आपला या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत आमदारांचं पथक बारामतीला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सहानुभूती घेण्यासाठी मनसे आणि शिवसेनेत स्पर्धा असल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आणि सहकार मंत्र्यांची उसदरवाढीसंदर्भात तातडीची बैठक झाली. उसदरवाढीसंदर्भात राजू शेट्टी बोलायला तयार आहेत. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊसदरवाढीवर चर्चा करणार असल्याचं सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.

ऊसदरवाढीविरोधात पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱय़ांची आंदोलनं सुरूच आहेत. सांगली-पुणे-बंगलोर महामार्गावर आज शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्तोरोको केला. रास्तारोको करणाऱ्या २५ ते ३० शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

इंदापुरात मात्र उसदरवाढ आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. शंभरहून अधिक बैलगाड्यांची तोडफोड करण्यात आलीय. भीमा साखर कारखानाही बंद पाडण्यात आला.