मुंबईत बळावतोय स्वाईन फ्लू, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू

स्वाईन फ्ल्यूनं मुंबईत पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं असून, गेल्या 3 दिवसांत तिघा जणांना एचवनएनवन व्हायरसमुळं आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे यावर्षी मुंबईत स्वाईन फ्ल्यूमुळे बळी पडलेल्यांची संख्या 26 झाली आहे. 

Updated: Jul 19, 2015, 05:43 PM IST
मुंबईत बळावतोय स्वाईन फ्लू, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू title=

मुंबई: स्वाईन फ्ल्यूनं मुंबईत पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं असून, गेल्या 3 दिवसांत तिघा जणांना एचवनएनवन व्हायरसमुळं आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे यावर्षी मुंबईत स्वाईन फ्ल्यूमुळे बळी पडलेल्यांची संख्या 26 झाली आहे. 

एका 80 वर्षीय वृद्धाचा कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये, तर अन्य 2 तीस वर्षीय महिलांचा मुंबईतील दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गेल्या 3 दिवसांत स्वाईन फ्ल्यूमुळं मृत्यू झाला. एचवनएनवन व्हायरसच्या या वाढत्या प्रादूर्भावामुळे डॉक्टरही धास्तावले आहेत. 

बीएमसीच्या सर्व्हेनुसार जून 2015मध्ये सर्वाधिक 19 स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळले होते. मात्र जूलैच्या मध्यापर्यंत रूग्णांची संख्या 75पर्यंत पोहोचली आहे. शुक्रवारी आणखी 15 रूग्णांना एचवनएनवन व्हारसची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.