शिवसेनाला शह देण्यासाठी भाजपचे डिजिटल एज्युकेशन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी टँबला उत्तर देण्यासाठी भाजप डिजिटल एज्युकेशन हा प्रोग्रँम आणत आहे. 

Updated: Aug 20, 2015, 12:17 PM IST
शिवसेनाला शह देण्यासाठी भाजपचे डिजिटल एज्युकेशन title=

कृष्णात पाटील, मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी टँबला उत्तर देण्यासाठी भाजप डिजिटल एज्युकेशन हा प्रोग्रँम आणत आहे. 

मुंबई महापालिकेत सत्तेत एकत्र असलेली शिवसेना आणि भाजप एकमेकांवर कुरघोडी करण्याचा एकही प्रयत्न दोन्ही पक्ष सोडत नाहीत. 

मरिन ड्राईव्हवर एलईडी दिवे लावण्याचा प्रश्न असो किंवा नाईट लाईफचा प्रस्ताव. शिवसेना आणि भाजप नेहमीच एकमेकांच्या कल्पनांवर कुरघोडी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आलेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिका शाळेतील मुलांना टँब दिले जात असताना भाजप कशी काय शांत राहणार. त्यामुळंच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आयुक्त अजोय मेहता यांना भेटून डिजिटल एज्युकेशन कार्यक्रम राबवण्याची विनंती केली. तसंच व्हँल्यूड संस्थेमार्फत आयुक्तांसमोर सादरीकरणही केले.

योजनेची नाव वेगवेगळी असली तरी कल्पना मात्र एकच असून ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी माडंल्याचं सेनेनं स्पष्ट केलंय. २०१७ च्या पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून श्रेय लाटण्याचं सुरू असल्याचा टोला शिवसेनेनं भाजपला हाणला. 

पालिका शाळेतील आठवीच्या मुलांना दोन वर्षांत ३२ कोटी रूपयांचे टँब वाटले जाणारेत. याचे पूर्ण श्रेय शिवसेनेला दिलं जातंय. यामध्ये बँकफूटावर गेलेला भाजप डिजिटल एज्युकेशनचा कार्यक्रम आणून काही प्रमाणात श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.