छोट्या वाहनांना राज्यात टोल माफी होणार?

टोलने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील सामान्य जनतेला दिलासा देणारी बातमी.... टोलमधून राज्यातील जनतेला लवकरच मिळणार मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  या आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Updated: Apr 7, 2015, 08:08 PM IST
छोट्या वाहनांना राज्यात टोल माफी होणार? title=

मुंबई : टोलने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील सामान्य जनतेला दिलासा देणारी बातमी.... टोलमधून राज्यातील जनतेला लवकरच मिळणार मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  या आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई एन्ट्री पाँईट टोल वगळता राज्यातील सर्व टोल माफ होण्याची शक्यता आहे.  light Moter vehicle (कार) यांचा टोल पूर्ण माफ करण्याची घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

टोल माफीसाठी सरकारपुढे तीन पर्याय आहे. टोल वसुलीचा कालावधी वाढवणे, जड वाहनांवर टोल वाढवणे, किंवा सरकारकडून कंत्राटदारांना टोलची रक्कम देणे
या तीन पैकी कोणता मार्ग सरकार निवडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.