विद्यार्थ्याला मारहाण केल्याने २ टीसींना निलंबनाचं तिकीट

लोकलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या रेल्वेच्या दोनही टीसींना निलंबित करण्यात आलं आहे.  आर.एल. यादव आणि विनोद यादव अशी निलंबित टीसींची नावं आहेत. 

Updated: Jan 18, 2015, 10:49 PM IST
विद्यार्थ्याला मारहाण केल्याने २ टीसींना निलंबनाचं तिकीट title=

मुंबई : लोकलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या रेल्वेच्या दोनही टीसींना निलंबित करण्यात आलं आहे.  आर.एल. यादव आणि विनोद यादव अशी निलंबित टीसींची नावं आहेत. 

नवी मुंबईच्या सानपाड्याहून ठाण्याला जात असताना एका विद्यार्थ्यांला टीसीनं तिकीटाची विचारणा केली. यावर या विद्यार्थ्यानं आपल्याकडे पास आहे, पण त्याची तारीख संपली असल्याचं सांगितलं, यावरून संतापलेल्या टीसीनं शिवीगाळ करत विद्यार्थ्याला मारहाण केली. 

अखेर प्रवाशांनी टीसीला रोखण्याचा प्रयत्न केला. पण तरीही टीसीची मारहाण सुरुच राहिली. एका ज्येष्ठ नागरिकांनं हा व्हिडीओ शुट केला. हा व्हिडीओ प्रसिद्धी माध्यमांवर झळकल्यानंतर दोन्ही टीसींचं निलंबनाचं तिकीट फाटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.