`व्हॉट्स अॅप`ची भाषा उत्तर पत्रिकेत

Last Updated: Thursday, April 24, 2014 - 11:25

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्याच्या तरुणाईला सोशल नेटवर्कींग साईट्सची इतकी सवय लागली आहे की, काही तरूणांनी चक्क व्हॉट्स अॅपची भाषा उत्तर पत्रिकेत उतरवली आहे. दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिकेत हा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकाराने मात्र शिक्षकांना आश्चर्य झालं आहे. तरूणांमध्ये इंग्लिश एसएमएसची एक स्वत:ची अशी एक भाषा आहे.
या भाषेला अजून शिक्षणात प्रमाण मानता येणार नाही, असे एका शिक्षकाने सांगितले. शिक्षकांच्या सांगण्यानुसार विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत एसएमएस भाषेतील यू, युवर, अॅम, गुड, गिव्ह, देअर, द, बिकॉझ, बी, विल, व्हॉट, व्हेअर, व्हेन, व्हाय, देम, दॅट, हॅव, हॅड, नो, विथ या शब्दांना मॅसेजच्या रुपात लिहले आहे.
विद्यार्थ्यांनी the - (d), there - (der), that - (dat), then - (den), have - (hv), had - (hd), will - (ll), with - (wit), what - (wat), when - (wen), where - (wer), why - (wy), be - (b), becouse - (bcoz), talk - (tlk), sorry - (sry), you - (u), your - (ur), am - (m), know - (kno), good - (gud), give - (giv), about - (abt), check - (chk), could - (cld), click - (clk), see - (c), fabulous - (fab), okay - (k), never - (nvr), people - (ppl), quick - (qik), really - (rly), thanks - (thnx), very - (vry) अशा प्रकारचे शब्द उत्तर पत्रिकेत वापरले आहेत.
शिक्षकांनी याबाबत गूण देताना ज्या विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये या भाषेचा जास्त वापर झाला असेल, त्यांचे गूण कमी देण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Thursday, April 24, 2014 - 11:25


comments powered by Disqus
Live Streaming of Lalbaugcha Raja