आदर्श घोटाळ्याचा अहवाल सरकारने फेटाळला

आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याचा चौकशी अहवाल सरकारला मान्य नसल्याने मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा अहवाल सरकारने फेटाळला. राज्य मंत्रीमंडळाने हा अहवाल फेटाळला असला तरी आज दुपारी हा अहवाल विधीमंडळात मांडण्यात येणार आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 20, 2013, 12:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याचा चौकशी अहवाल सरकारला मान्य नसल्याने मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा अहवाल सरकारने फेटाळला. राज्य मंत्रीमंडळाने हा अहवाल फेटाळला असला तरी आज दुपारी हा अहवाल विधीमंडळात मांडण्यात येणार आहे.
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल मांडण्यात आला. त्यावेळी सरकारतर्फे हा अहवाल फेटाळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आदर्श हाऊसिंग सोसायटीच्या उभारणीत बड्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या अहवालात सरकार आणि अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी काही अधिकारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, अहवालातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली तर राज्यात अधिकाऱ्यांना काम करणे अवघड होणार आहे. याच पार्श्वभूमीवर हा अहवाल फेटाळला असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.