सातपुड्यातल्या आदिवासींचं अस्तित्वच नष्ट होणार?

नर्मदा नदीतलं पाणी तापीच्या खोऱ्यात आणण्यासाठी सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये सात बंधारे निर्माण करण्याची योजना जलसंपदा विभागानं तयार केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 9, 2013, 12:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, धुळे
नर्मदा नदीतलं पाणी तापीच्या खोऱ्यात आणण्यासाठी सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये सात बंधारे निर्माण करण्याची योजना जलसंपदा विभागानं तयार केलीय. मात्र, या बांधांमुळे सातपुड्यातल्या आदिवासींच अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पाला जोरदार विरोध होतोय.
नर्मदा सरोवरातून महाराष्ट्राला मिळणारं ११ टीएमसी पाणी तळोदा, शहादा तालुक्यात आणण्यासाठी जलसंपदा विभागानं नर्मदा आणि तापी नदीचं खोरं जोडण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी १६ कोटींचा खर्चही झालाय. मात्र, हा प्रकल्प झाल्यास सातपुड्यातला आदिवासी विस्थापित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरलेत. यलगार तालुक्यातल्या धाडगावमध्ये या प्रश्वावर नुकताच सत्याग्रह करण्यात आला.
या प्रकल्पाला अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातल्या आदिवासींचा जोरदार विरोध आहे. आपलं हित साधण्यासाठी काही ठराविक अधिकारी आणि मंत्री हा प्रकल्प रेटत असल्याचा आरोप करण्यात येतोय.
याच परिसरातल्या उकाई धरणाच्या पाण्याचा विनीयोग राज्य सरकारला करता आलेला नाही. असं असताना ही नवी धरणं कोणाच्या अट्टहासापायी उभारला जातायत हा संशोधनाचा विषय आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.