फिफा फुटबॉल : इंग्लंडचं आव्हान जवळपास संपुष्टात

उरुग्वेने इंग्लंडला 2-1ने पराभूत करत इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आणलय. चार आठवड्यांपूर्वी गुडघ्यावर सर्जरी झालेल्या सुआरेझने दमदार कमबॅक करत उरुग्वेच्या नावावर पहिल्या विजयाची नोंद केली. तर रुनीने पुन्हा एकदा दोन गोल्डन चान्स गमावले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 20, 2014, 07:59 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, ब्राझील
उरुग्वेने इंग्लंडला 2-1ने पराभूत करत इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आणलय. चार आठवड्यांपूर्वी गुडघ्यावर सर्जरी झालेल्या सुआरेझने दमदार कमबॅक करत उरुग्वेच्या नावावर पहिल्या विजयाची नोंद केली. तर रुनीने पुन्हा एकदा दोन गोल्डन चान्स गमावले.
रुनी एक गोल झळकावू शकला तो त्याच्या वर्ल्ड कप करियरमधील पहिला गोल ठरला. उरुग्वेकडून सुआरेझने दोन गोल करत उरुग्वेला या वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवून दिला.
आयव्हरी कोस्ट पराभूत
कोलंबियाने आयव्हरी कोस्टला 2-1ने पराभूत करत ग्रुप `सी`मध्ये अव्वल स्थान पटकावलय. मॅचमध्ये पहिल्या हाफमध्ये एकही गोल झाला नाही. दुस-या हाफमध्ये नऊ मिनिटांमध्ये लढतीमध्ये रंगत निर्माण झाली. 64 व्या मिनिटाला 22 वर्षीय जेम्स रॉड्रिग्जने गोल करत कोलंबियाला पहिल यश मिळवून दिल.
70व्या मिनिटाला 21 वर्षीय जुआन क्वान्ट्रोने दुसरा गोल केला. यानंतर तिनच मिनिटांनी गर्व्हिनोने गोल करत आयव्हरि कोस्टच खात उघडल. मात्र, अखेर कोलंबियाने विजय मिळवत प्री-क्वार्टरमधील आपल स्थान पक्क केल.
मुकाबला ड्रॉ
ग्रुप `सी`मधील जपान आणि ग्रीसमध्ये झालेला मुकाबला ड्रॉ झाला. ड्रॉमुळे दोन्हीही टीम्सचं स्पर्धेतील आव्हान अद्यापपर्यंत कायम आहे. मॅचमध्ये दोन्हीही टीम्सला गोल करता आला नाही.
ग्रीस आणि जपानने या दोन्ही टीम्सने आपल्या पहिल्या मॅचेस गमावल्या आहेत. ग्रीसचा कोलंबियाकडून तर जपानचा आयव्हरी कोस्टकडून पराभव झाला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.