पुण्यात 3 तासांत झाला 3 किलोमीटर रस्ता तयार...

प्रशासनाच्या कार्यतत्परतेचा अनोखा नमुना पुण्यात समोर आलाय. वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्याचं काम अवघ्या ३ तासांत पूर्ण करण्यात आलंय. कशी फिरली ही जादूची कांडी? हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर जाणून घ्या...

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 5, 2014, 09:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
प्रशासनाच्या कार्यतत्परतेचा अनोखा नमुना पुण्यात समोर आलाय. वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्याचं काम अवघ्या ३ तासांत पूर्ण करण्यात आलंय. कशी फिरली ही जादूची कांडी? हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर जाणून घ्या...
वडगाव बुद्रुकमधल्या घुले नगरमध्ये एक चमत्कार झालाय. वर्षानुवर्ष इथले नागरिक रस्ता चांगला करण्यासाठी पाठपुरावा करत होते. पण काहीही होत नव्हतं. अखेर जादूची कांडी फिरावी, तसा फक्त तीन तासांत हा ३ किलोमीटरचा रस्ता चकाचक झाला आणि तोसुद्धा डांबरीकरणाचं काम पूर्ण झाल्यावर...
आता हा चमत्कार कसा झाला... गेल्या आठवड्यात याठिकाणी एक कार्यक्रम होता. उपमुख्यमंत्री अजित पवार एका बांधकाम प्रकल्पाच्या उद्घाटनाला येणार होते. स्वत: अजित पवार येणार म्हटल्यावर प्रशासनाच धाबं दणाणलं आणि हे काम पूर्ण करण्यात आलं, असं असलं तरी या कामाचा दर्जा काय हा भाग निराळाच.
आणखी महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री जिथपर्यंत येणार होते तिथपर्यंतचाच रस्ता बनवण्यात आला. अर्थात या नियोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री पोहोचू शकले नाहीत, ही बाब अलहिदा..... रस्ता झाला हे महत्वाचं. त्यामुळे आता रस्त्याच्या उरलेल्या कामासाठी इथल्या लोकांना आणखी एखाद्या नेत्याची वाट पहावी लागणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.