पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला चालू आर्थिक वर्षात आर्थिक पातळीवर अच्छे दिन येणार आहेत.
जकात रद्द झाल्यावर सुरू झालेल्या एलबीटीमुळे महापालिकेचं उत्पन्न वाढलं होतं. मात्र भाजप शिवसेना सरकारने एलबीटी रद्द केला. ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापा-यांकडूनच एलबीटी आकारला जात आहे. तरीही महापालिकेच्या उत्पन्नात फरक पडणार नाही असा दावा करण्यात आलाय.
राज्य सरकारकडून मिळाणारं अनुदान आणि ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापा-यांकडून मिळणारा एलबीटी यामुळे महापालिकेला चालू आर्थिक वर्षात 1200 कोटी रूपयांचं उत्पन्न मिळणार असल्याचं सांगण्यात येतं.
एलबीटी रद्द झाल्यावर पालिकेचं उत्पन्न घटून कर्मचा-यांचे पगारही होणार नाहीत याची भीती कर्मचा-यांना होती. त्य़ासाठी आंदोलनही करण्यात आलं होतं. पण उत्पन्नाचा अंदाज पाहता पिंपरी चिंचवड महापालिका आपला श्रीमंत महापालिका हा लौकीक कायम राखणार अशी चिन्हं आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.