उपमुख्यमंत्री अजित पवारांची असंवेदनशीलता!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अत्यंत बेजबाबदारपणा पुण्यात दिसून आला. उत्तराखंडातील पुरात अडकलेल्या भाविकांच्या नातेवाइकांसोबत अत्यंत निष्ठुर वर्तन उपमुख्यमंत्र्यांनी केलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 24, 2013, 05:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अत्यंत बेजबाबदारपणा पुण्यात दिसून आला. उत्तराखंडातील पुरात अडकलेल्या भाविकांच्या नातेवाइकांसोबत अत्यंत निष्ठुर वर्तन उपमुख्यमंत्र्यांनी केलं.
उत्तराखंडच्या पुरामध्ये अजूनही अनेक जण अडकलेत. त्या लोकांची गेले दहा दिवस कुठलाही संपर्क झालेला नाही. अशा परिस्थितीत त्यांचे नातेवाईक पुण्यात अजित पवारांना भेटण्यासाठी गेले होते. अजित पवारांनी त्यांना थांबायला सांगितलं, आणि दहा मिनिटांत तुम्हाला भेटतो, असं आश्वासनही दिलं. पुरात अडकलेल्यांचे नातेवाईक दोन तास अजित पवारांची वाट पहात होते. पण त्यांना न भेटताच, आणि कुठलाही निरोप न देता अजित पवार परस्पर निघून गेले.
पुरात अडकलेल्यांच्या नातेवाईकांना दिलासा देणं किंवा मदत देणं दूरच. साधे धीर देणारे चार शब्दही अजित पवारांना पुण्यातल्या या लोकांशी बोलता आले नाहीत. अर्थातच या सगळ्या घटनेवर पुरात अडकलेल्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.