सांगलीत भावकीनं कुटुंबाला टाकलं वाळीत

सांगलीत आईच्या निधनानंतर सातव्या दिवशी उत्तर कार्य घेतल्याने भावकीने डूबल कुटुंबाला बहिष्कृत केलंय. गेले आठ महिने त्यांना कोणत्याही कार्यात सामावून घेतलेलं नाही. तासगाव तालुक्यातील धुळगाव इथं हा प्रकार घडलाय. 

Updated: Dec 26, 2015, 09:47 AM IST
 सांगलीत भावकीनं कुटुंबाला टाकलं वाळीत title=

सांगली : सांगलीत आईच्या निधनानंतर सातव्या दिवशी उत्तर कार्य घेतल्याने भावकीने डूबल कुटुंबाला बहिष्कृत केलंय. गेले आठ महिने त्यांना कोणत्याही कार्यात सामावून घेतलेलं नाही. तासगाव तालुक्यातील धुळगाव इथं हा प्रकार घडलाय. 

आईच्या निधनानंतर तिच्या इच्छेनुसार धुळगावातल्या भगतसिंह डूबल यांनी सातव्या दिवशी उत्तर कार्य केलं. मात्र या कृत्याचा भावकीला राग आला. 26 एप्रिलपासून भावकीनं डुबल कुटुंबाला वाळीत टाकलंय. 

समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमास त्यांना बोलावले जात नाही. विविध बंधनं घालून छळण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप पीडित डुबल कुटुंबानं केलाय. यासंदर्भात डुबल यांनी तासगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय.