मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर टेम्पोला आग

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा एक्झिटजवळ शनिवारी सकाळी टेम्पोला आग लागल्याची घटना घडली. 

Updated: Dec 26, 2015, 09:15 AM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर टेम्पोला आग title=

खंडाळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा एक्झिटजवळ शनिवारी सकाळी टेम्पोला आग लागल्याची घटना घडली. 

पोस्टल डाकचं पार्सल घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागली. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. 

खंडाळा एक्झिटजवळ कूणे गाव पुलाच्या जवळ सात ते साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे.