‘वादग्रस्त वास्तूचं उद्घाटन राष्ट्रपती करतातच कसे?’

मराठी भाषकांचा विधानभवनाला विरोध आहे. या विरोधाला न जुमानता कर्नाटक सरकारनं कोट्यवधी रुपये खर्चून विधानभवन बांधलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 11, 2012, 01:34 PM IST

www.24taas.com, बेळगाव
कर्नाटक राज्य सरकारनं बांधलेल्या बेळगाव विधानभवनाच्या उदघाटनासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बेळगावमध्ये दाखल झालेत. उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू झालाय. मराठी भाषकांचा विधानभवनाला विरोध आहे. या विरोधाला न जुमानता कर्नाटक सरकारनं कोट्यवधी रुपये खर्चून विधानभवन बांधलंय.
दरम्यान, मुंबईत महाराष्ट्र एकिकरण समितीचे नेते किरण ठाकून यांनी आपले उपोषण आजही सुरूच ठेवलंय. दादरमध्ये प्रबोधन ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी पुतळ्यासमोरच आपलं उपोषण सुरू ठेवलंय. राष्ट्रुपतींनी बेळगावमधल्या विधान भवनाच्या उदघाटनाला जाऊन मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप त्यांनी केलाय. महाराष्ट्र सदन वादात अडकल्यानंतर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील जर त्याचं उदघाटन करत नाहीत तर प्रणव मुखर्जी बेळगावमधल्या विवादास्पद वास्तूचं कसं उदघाटन करू शकतात? असा सवाल ठाकूर यांनी केला. यावरून राष्ट्रुपती कर्नाटकला झुकतं मात देत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. याबाबत राष्ट्रपतींविरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याचं त्य़ांनी सांगितलंय.