मोदींनी पंतप्रधान व्हावं, हीच दीदींची इच्छा!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी भाजपचे पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केलाय. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान व्हावं, अशी इच्छा लता मंगेशकर यांनी यावेळी व्यक्त केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 1, 2013, 10:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यात शुक्रवारी दीनानाथ मंगेशकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी भाजपचे पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केलाय. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान व्हावं, अशी इच्छा लता मंगेशकर यांनी यावेळी व्यक्त केलीय.
लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर आणि अन्य मंगेशकर कुटुंबीय यावेळी हजर होते. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा लतादीदींनी यावेळी व्यक्त केली. मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. यामुळे साहजिकच अनेकांच्या भुवया उंचावल्या.
तत्पुर्वी पुण्यात झालेल्या जाहीर सभेत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसशासित राज्यांमध्ये गरिबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. त्यामुळं कुणी कीती विकास केला याची खुली चर्चा करा असं आव्हान मोदींनी काँग्रेसला दिलंय. मोदींवर आरोप करण्याची फॅशनच झाली असल्य़ाचाही टोला त्यांनी काँग्रस नेत्यांना लगावला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.