माणिकरावांची कांदा विक्री, तळमळ की स्टंट?

कांद्याचे भाव गगनाला भिडले असताना सामान्य नागरिकांना महागाईतून थोडा तरी दिलासा मिळावा म्हणून पुण्यात स्वस्त दारात कांदा विक्री करण्यात येत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 13, 2013, 11:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
कांद्याचे भाव गगनाला भिडले असताना सामान्य नागरिकांना महागाईतून थोडा तरी दिलासा मिळावा म्हणून पुण्यात स्वस्त दारात कांदा विक्री करण्यात येत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनंच ही विक्री सुरू केलीय आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्वतः या केंद्रांवर उभं राहून कांद्याची विक्री केली.

कांदा ७० रुपयांवर गेला असताना या केंद्रांवर ४० रुपये दरानं कांदा विकला जात होता. त्यामुळेच मंडई परिसरात पुणेकरांनी रांगा लावल्या होत्या. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचंच सरकार असताना कृत्रिमरित्या भडकलेल्या दरांवर नियंत्रण आणणं त्यांना शक्य झालेलं नाही.
असं असताना माणिकरावांची ही कांदाविक्री खरोखर सामान्यांप्रति तळमळ आहे की केवळ स्टंट असा प्रश्न महाराष्ट्रातल्या नागरिकांना पडलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.