सबनीसांनी व्यक्त केली मोदींकडे दिलगिरी

माझ्या वक्तव्यांचा विपर्यास केला गेला - सबनीस

Updated: Jan 12, 2016, 07:07 PM IST
सबनीसांनी व्यक्त केली मोदींकडे दिलगिरी title=

पुणे : ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्यावर विवादात्मक वक्तव्य करत चांगलेच चर्चेत आले होते. भाजपच्या अनेक नेत्यांना सबनिस यांच्या वक्तव्याचा निषेध करत वेगवेगळ्या प्रकरे त्यांचा विरोध दर्शवला.

श्रीपाल सबनिस यांनी मात्र आता या वादावर पडता टाकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एकेरी वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. यावेळी आपण मोदींबद्दल करण्यात आलेले वक्तव्य मागे घेत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या पाकिस्तान दौऱ्याचा आदर असल्याचेही ते म्हणाले. पण माझ्या वक्तव्यांचा विपर्यास केला गेला असल्याचं त्यांनी म्हटलं.