राज यांचा महाराष्ट्र दौरा, नागपूरात स्वागत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच आज दुपारी नागपूरात आगमन झालं. यावेळी शहरातल्या मनसे कार्यकर्त्यांनी अत्यंत जल्लोषात राज ठाकरेंचे स्वागत केलं.

Updated: Mar 15, 2013, 05:42 PM IST

www.24taas.com, नागपूर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच आज दुपारी नागपूरात आगमन झालं. यावेळी शहरातल्या मनसे कार्यकर्त्यांनी अत्यंत जल्लोषात राज ठाकरेंचे स्वागत केलं.
राज विदर्भाचा १० दिवसांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. यावेळी राज विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा काढणार असले तरीही, या दरम्यान ते फक्त एकच जाहीर सभा घेणार आहेत. महत्वाचे म्हणजे आपल्या दौऱ्यात राज ठाकरे भंडारा जिल्ह्यातील एकाच घरातील तीन अल्पवयीन बहिणींची हत्या झालेल्या मुरमाडी गावाला भेट देणार आहेत.
यावेळेस राज ठाकरे एकच सभा घेणार असल्याने कोणाला टार्गेट करणार, कोणाला देणार प्रतिउत्तर याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसापूर्वीच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला खडसेंनीही प्रत्युत्तर दिलं होतं त्यामुळे राज ठाकरें त्यांचाही समाचार घेणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.