‘लिटिल मास्टर’चे ४० चित्तवेधक किस्से

‘लिटिल मास्टर’चे ४० चित्तवेधक किस्से

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 11, 2013, 12:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘लिटिल मास्टर’चे ४० चित्तवेधक किस्से
१) सचिन तेंडुलकर हा राज्यसभेत नामांकित झालेला क्रिकेट मैदानात
सक्रिय असणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
२) १९८७ सालच्या डेनिस लिली’ज एमआरएफ पेस फाऊंडेशनने होतकरू फास्ट बॉलर असणाऱ्या सचिनला नाकारले होता.
३) १९८७ झालेल्या विश्वचषकात भारत आणि झिम्बाम्ब्वेमधील सामन्यात सचिन तेंडुलकर बॉल बॉय म्हणून काम करत होता. तेव्हा तो १४ वर्षांचा होता.
४) १९८८ साली ब्रेबोर्न स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरने भारत वि. पाकिस्तान एकदिवसीय सामन्यात पर्यायी खेळाडू म्हणून पाकिस्तानसाठी फिल्डिंग केली होती.
५) सचिनकडे त्याचे गुरू रमाकांत आचरेकर यांनी दिलेली १३ नाणी आहेत. नेट प्रॅक्टिस करताना संपूर्ण सत्रात सचिन बाद न झाल्यास गुरू आचरेकर त्याला नाणं देत.
६) ऑक्टोबर १९९५ साली वर्ल्ड टेल या कंपनीशी ३१.५ कोटी रुपयांचा ५ वर्षांचा करार केल्यावर सचिन तेंडुलकर सर्वांत श्रीमंत क्रिकेटर बनला.
७) लहानपणी सचिन आपलं क्रिकेटचं साहित्य सोबत घेऊनच झोपायचा
८) सचिन तेंडुलकरला विविध परफ्युम्स आणि घड्याळं जमवण्याचा छंद आहे.
९) तेंडुलकरची पहिली गाडी मारूती ८०० होती
१०) सचिन तेंडुलकर हा पहिला आंतरराष्ट्रीय बॅट्समन ठरला, ज्याला थर्ड अम्पायरने आऊट म्हणून घोषित केलं. १९९२ साली, डर्बन टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी जोन्टी ऱ्होड्सने सचिनला रन आऊट केलं होतं. टीव्हीवर याचे रिप्ले पाहून सचिनला आऊट घोषित करण्या आलं. दक्षिण आफ्रिकेचे कार्ल लिबेनबर्ग हे या मॅचचे तिसरे अंपायर होते.
११) १९ व्या वर्षी कंट्री क्रिकेट खेळणारा सचिन सर्वांत तरुण भारतीय होता.
१२) स्टिकिंग प्लॅस्टरच्या जाहिरातीतून सचिन तेंडुलकरने जाहिरातींच्या विश्वात पदार्पण केलं
१३) सचिन तेंडुलकरने एंडोर्स केलेला पहिला ब्रँड म्हणजे ‘बूस्ट’ हेल्थ ड्रिंक. १९९० साली सुरू झालेल्या बूस्टच्या अनेक जाहिरातींमध्ये सचिन तेंडुलकर कपिल देवसोबत असे.
१४) पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लिश बॉलर अॅलन मुलालीने सचिन वापरत असलेली बॅट इतर बॅट्सच्या तुलनेत जास्त रुंद असल्याची तक्रार केली होती.
१५) रणजी, दुलीप आणि इराणी करंडकात सचिन तेंडुलकरने शतकं झळकावली होती.
१६) तत्कालीन कर्णधार रवी शास्त्री याच्या नेतृत्वाखाली सचिनने रणजी करंडकात पदार्पण केलं
१७) सचिन तेंडुलकर जड बॅट वापरतो. या बॅटचं वजन ३.२ पौंड असतं. द. आफ्रिकेचा लान्स क्लुजनर जगातील सर्वांत जड बॅट वापरतो.
१८) सचिन आज जरी अत्यंत संयमी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असला, तरी शाळेत तो खूपच मस्तीखोर होता.
१९) १९९५ साली सचिन वेषांतर करून रोजा सिनेमा पाहायला गेला होता. त्याने नकली दाढीही लावली होती. मात्र त्याचा गॉगल पडल्यामुळे लोकांनी त्याला ओळखलं आणि त्याच्याभोवती गर्दी जमली.
२०) सचिन तेंडुलकरला राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन आणि पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारचे हे सगळे पुरस्कार मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे.
२१) रविवारी संध्याकाळी, जेव्हा सगळे टीव्हीवर गाईड सिनेमा पाहात होते, तेव्हा लहानगा मस्तीखोर सचिन झाडावरून पडला होता. यावर चिडून त्याच्या ज्येष्ठ बंधुंनी (आणि गुरू) अजित तेंडुलकर यांनी शिक्षा म्हणुन सचिनला क्रिकेट शिकायला पाठवलं.
२२) खोडकर सचिन लहानपणी आपल्या साहित्य सहवासाच्या कुंपणावरून बाहेरील ओढ्यातील गप्पी मासे पकडत असे.
२३) एका मराठी वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना सचिन तेंडुलकरने आपण ‘वडा पाव’साठी वेडं असल्याचं जाहीर केलं होतं.
२४) सचिनने आपल्या लाडक्या व्हॅम्पायर बॅटने ५०वं शतक ठोकलं होतं.
२५) पाकिस्तानशी पहिला सामना खेळताना सचिनने त्याला सुनिल गावस्करने भेट दिलेले पॅड वापरले होते.
२६) सचिन तेंडुलकर माजी टेनिस खेळाडू जॉन मॅकेन्रोचा चाहता होता. त्याने मॅकेन्रोसारखे केस वाढवले होते आणि बँडही बांधला होता.
२७) १९९८ साली सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ९ शतकं झळकावली होती.
२८) १९९८ या वर्षभरात सचिनने एकदिवसीय सामन्यांमध्ये १८९४ धावा काढल्या. क्रिकेटमध्ये एका वर्षात एवढ्या धावा काढण्याचा हा विक्रम आहे.
२९) सचिन तेंडुलकरचं कौतुक करणाऱ्यांध्ये इतर क्रीडा प्रकारातील दिग्गज खेळाडूही समाविष्ट आहेत. टेनिस खेळाडू पीट सॅम्प्रस आणि बोरीस बेकर, अर्जेंटिनाचा फुटबॉलर दिएगो मॅरेडोना हा ही सचिनचा चाहत