पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव

भारत विरुद्ध वेस्टइंडीजदरम्यान पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागलाय. १२४ रन्सनं वेस्ट इंडीजनं टीम इंडियाचा पराभव केला. पाच वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये पहिली मॅच जिंकून इंडीज टीमनं १-०नं आघाडी घेतलीय. 

PTI | Updated: Oct 9, 2014, 10:41 AM IST
पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव title=

कोच्ची: भारत विरुद्ध वेस्टइंडीजदरम्यान पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागलाय. १२४ रन्सनं वेस्ट इंडीजनं टीम इंडियाचा पराभव केला. पाच वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये पहिली मॅच जिंकून इंडीज टीमनं १-०नं आघाडी घेतलीय. 

टॉस जिंकून भारतानं पहिले फिल्डिंग घेतली होती. वेस्ट इंजिडच्या सॅम्युएल्सनं नाबाद १२६ रन्स करून विंडीजचा स्कोअर ३२१ रन्सवर नेऊन ठेवला. सॅम्युएल्सलाच मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला.  
 
मॅचमध्ये ३२२ रन्सचा पाठलाग करताना भारताचा डाव १९७ रन्सवरच आटोपला. शिखर धवननं ६८, जाडेजानं नाबाद ३३ आणि रहाणेनं केवळ २४ रन्स केले. विराट कोहली, सुरेश रैना आणि धोनी हे मधल्या फळीतले बॅट्समनही सपशेल अपयशी ठरले.
 
विंडीजकडून रामपॉल, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम्युएल्सनं प्रत्येकी दोन तर टेलर, रसेल आणि सॅमीनं प्रत्येकी एक विकेट काढली.

सीरिजमधील दुसरी मॅच आता 11 ऑक्टोबरला दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.