फिफा वर्ल्ड कप : अमेरिका बाहेर, बेल्जियम, अर्जेन्टीनाचा विजय

 दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन अर्जेन्टाईन टीमला स्विजर्झर्लंडच्या टीमनं विजयासाठी चांगलाच संघर्ष करायला लावला. एक्स्ट्रा टाईममध्ये गेलेल्या या मॅचमध्ये वर्ल्ड कपच्या विजयाचे प्रमुख दावेदार असलेल्या अर्जेन्टीनानं स्वित्झर्लंडचा 1-0 नं पराभव केला. डी मारियानं एक्स्ट्रा टाईम संपायच्या काही मिनिटापूर्वी गोल करत आपल्या टीमला विजय साकारून दिला. 

AP | Updated: Jul 2, 2014, 07:57 AM IST
फिफा वर्ल्ड कप : अमेरिका बाहेर, बेल्जियम, अर्जेन्टीनाचा विजय title=

ब्राझील : दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन अर्जेन्टाईन टीमला स्विजर्झर्लंडच्या टीमनं विजयासाठी चांगलाच संघर्ष करायला लावला. एक्स्ट्रा टाईममध्ये गेलेल्या या मॅचमध्ये वर्ल्ड कपच्या विजयाचे प्रमुख दावेदार असलेल्या अर्जेन्टीनानं स्वित्झर्लंडचा 1-0 नं पराभव केला. डी मारियानं एक्स्ट्रा टाईम संपायच्या काही मिनिटापूर्वी गोल करत आपल्या टीमला विजय साकारून दिला. 

मार्क विल्मोटस यांची मोक्याच्या क्षणी सबस्टिट्यू फिल्डर उतरवाण्याची चाल पुन्हा एकदा यशस्वी झली. बेल्जियमच्या टीमनं एक्ट्रा टाईममध्ये दोन गोल करत अमेरिकन टीमवर 2-1 नं विजय मिळवला. आता रेडी डेव्हिल्सचा पुढचा मुकाबला हा बलाढ्य अर्जेन्टीनाच्या टीमशी होणार आहे. 

अर्जेन्टीनाच्या टीमला क्वार्टर फायनल गाठण्यासाठी स्वित्झर्लंडची टीमकडून एवढा कडवा सहन कराव लागेल असं वाटलं नव्हतं. लिओनेल मेसीची टीम या मॅचमध्ये सहज बाजी मारेल अशी आशा त्यांच्या चाहत्यांना होती. मात्र, स्विस टीमनं 90 मिनिटं अर्जेन्टीनाला रोखून धरत एकही गोल करू दिला. निर्धारित वेळेत दोन्ही टीम्सना गोल करता आले नव्हते. त्यामुळे मॅच एक्स्ट्रा टाईममध्ये गेली. जादा वेळ संपायलाही काही मिनिटं शिल्लक होती. आणि मागील प्री-क्वार्टर फायनलच्या मॅचेसमध्ये जे चित्र पाहायला मिळालं होतं. त्याचीच पुनरावृत्ती या मॅचमध्ये झाली.

लिओनेल मेसीचा मॅजिकल टच मिळाला आणि अर्जेन्टीनाच्या डी मारियानं गोल झळकावत आपल्या टीमला आघाडी मिळवून दिली. डी मारियाला लिओनेल मेसीनं सुरेख पास दिला आणि कुठलीही संधी न दवडता डी मारियानं बॉल गोलपोस्टमध्ये धाडला. स्विस टीमनंही गोल करण्याचा प्रयत्न केला. जमालीनं हेडरवर गोल कऱण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा बॉल गोल पोस्टच्या बार लागला. यानंतर रिबाऊंडवरूनही त्याला गोल करण्याची संधी होती. मात्र, गोल काही झाला नाही आणि स्विस टीमचं पहिल्यांदाच क्वार्टर फायनल गाठण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.

स्विस टीमला एक फ्रि-कीकही मिळाली होती. मात्र याचा फायदा त्यांना उचलता आला नाही. अखेरच्या काही मिनिटात त्यांची मॅचवरची पकड सुटली आणि स्वित्झर्लंडला पराभवला सामोर जाव लागलं. या मॅचमध्येही अर्जेन्टीनाची टीम मेसी भरोसे असल्याचं जाणवलं. आता क्वार्टर फायनलमध्ये मेसी व्यतिरिक्त इतरही फुटबॉलपटूंना आपल्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करावं लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.