अजिंक्य रहाणेला राधिकानं केलं 'क्लीन बोल्ड'

भारतीय क्रिकेटर अजिंक्य राहाणे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. साहजिकच अनेक क्रिकेट आणि अजिंक्य फॅन्स असणाऱ्या तरुणींची हृदय तो तोडतोय, असं म्हणायला हरकत नाही.

Updated: Sep 20, 2014, 02:32 PM IST
अजिंक्य रहाणेला राधिकानं केलं 'क्लीन बोल्ड'   title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटर अजिंक्य राहाणे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. साहजिकच अनेक क्रिकेट आणि अजिंक्य फॅन्स असणाऱ्या तरुणींची हृदय तो तोडतोय, असं म्हणायला हरकत नाही.

अजिंक्य आपल्याच भागात राहणाऱ्या राधिका हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. हे अरेंज मॅरेज असल्याचं सांगण्यात येतंय. अजिंक्य आणि राधिका दोघेही महाराष्ट्रातलेच.... मुंबईचे! 

राधिका आणि अजिंक्य दोघेही मुंबईतल्या मुलुंडमध्येच राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, अजिंक्य आणि राधिका येत्या २६ सप्टेंबर रोजी विवाहबंधनात अडकतील.  

अजिंक्य रहाणे क्रिकेटर आहे, हे तुम्हाला माहितीच असेल पण त्याच्याकडे एक कराटे ब्लॅक बेल्टही आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.